Ad will apear here
Next
श्री विष्णूंचा इंडोनेशियातील पुतळा : हिंदू देवतेचा जगातील सर्वांत उंच पुतळा
हा फोटो आहे इंडोनेशिया देशातल्या बाली येथील, गरुडावर स्वार असलेल्या श्री विष्णूंच्या सोनेरी पुतळ्याचा!... इंडोनेशियन लोकांच्या भाषेत Garuda Wisnu Kencana Statue किंवा GWK Statue... (इंडोनेशियन भाषेत Kencana म्हणजे सोने, सोनेरी, सुवर्ण, Gold)

१२२ मीटर (४०० फूट) उंच असलेला, कुठल्याही हिंदू देवतेचा, जगातला सर्वांत उंच पुतळा आहे हा! (वाचकांच्या अंदाजासाठी, हा पुतळा, अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा, ३० मीटर (१०० फूट) उंच आहे!)

आरसीसी कोअरवर स्टीलच्या फ्रेम्स आणि सर्वांत बाहेर तांबे आणि पितळ्याचे पत्रे/शीट्स अशा तंत्रज्ञानाने बनवलेल्या ह्या पुतळ्याचे उंची हे जसे एक वैशिष्ट्य आहे, तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची रुंदी... जगभरातले विविध पुतळे बघितले, तर त्यांची रुंदी ही उंचीच्या प्रमाणात खूपच कमी असते; पण ह्या गरुडावर स्वार असलेल्या विष्णूच्या पुतळ्यातल्या मुख्य शिल्पाची उंची आहे साधारण ७६ मीटर (२५० फूट), तर रुंदी आहे ६६ मीटर (२१७ फूट)... आणि ह्या रुंदीपैकी, गरुडाच्या शिल्पाची उंची आणि त्याच्या पंखांचा पसारा हा जवळजवळ सारखाच, म्हणजे ६४ मीटर (२१० फूट) आहे!...

हिंदू संस्कृतीचा उगम भारतात; प्राचीन भारतात ह्या संस्कृतीच्या आश्चर्यकारक प्रतिभा आणि प्रतिमा निर्माण झालेल्या जगाने बघितल्या; मात्र आधुनिक जगात, ती संस्कृती अभिमानाने बाळगून, unapologetic रीतीने जगाला सांगणारा मात्र इंडोनेशिया... हा आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या भारतात राबवलेल्या ‘सर्वधर्मसमभाव’ ह्या संकल्पनेचा परिणाम...

- शरद केळकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZOXCK
Similar Posts
अद्भुत, अविश्वसनीय, प्राचीन भारतीय कला, विज्ञान, तंत्रज्ञान! कांचीपुरम येथील वरदराज पेरुमल (विष्णू) मंदिरातील, ग्रॅनाइटच्या एकाच शिळेतून कोरून काढलेली, अभंग दगडी कडी असलेली ही दगडी साखळी!
घर टोकियोतलं – भाग तीन जपानमधल्या हामा रिक्यू गार्डन, लायन्स कॅफे आणि माउंट फुजी या तीन ठिकाणांना दिलेल्या भेटी अविस्मरणीय होत्या. प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी अनुभवलेल्या जपानविषयी लिहिलेल्या लेखमालिकेचा तिसरा भाग...
वेरूळ येथील कैलास मंदिराची एक नाही, तर दोन आश्चर्ये!! वेरूळ येथील आठव्या शतकातील, हे एकाच प्रचंड खडकातून वरून खाली खणत आणलेले कैलास मंदिर (लेणे), हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक आश्चर्य आहेच... पण त्या मंदिराचे, त्याशिवाय अजूनही एक आश्चर्य आहे, ते म्हणजे, ते मंदिर घडवताना निघालेल्या तब्बल ४० कोटी किलोग्रॅम (!!!) दगडाचे पुढे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही
राजस्थानातील चांद बावरी स्टेपवेल : भारतीय वारसा वैभव ३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल!

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language